Sources
| Source | ID | Link |
|---|---|---|
| GoodReads | 243907176 | https://www.goodreads.com/book/show/243907176 |
| Amazon |
Description
'हेन्री डेव्हिड थोरो हा त्याच्या काळच्या सामाजिक रूढी झुगारून देणारा एक बंडखोर होता. तो अत्यंत धर्मशील असूनही त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याने 'सहीनिशी' आपल्या चर्चला रामराम ठोकला होता. तो कडक शिस्तीचे पालन करणारा असूनही शासनाची, राज्यसरकारची सत्ता अमान्य करणाऱ्या व्यवस्थेवर त्याचा विश्वास होता. तो कवी असूनही त्याच्या अभिव्यक्तीचे माध्यम गद्य होते. समकालीन लोकप्रिय, रूढ विचारांना अनुसरून चालणाऱ्या समाजात, जे लौकिक यश थोरोने मनापासून नाकारले, त्या पार्थिव यशामागे धावणाऱ्या समाजात थोरो स्वातंत्र्याचे उद्गान करत होता. हजारोंना साथसोबत करणाऱ्या 'वॉल्डन' या त्याच्या जगद्विख्यात लेखनापासून तो थेट महात्मा गांधींसारख्या अनेक इतर नेत्यांना स्फूर्ती देणाऱ्या 'सविनय कायदेभंग' (Civil Disobedience) या निबंधासारख्या लेखनापर्यंत त्याच्या साहित्यकृती म्हणजे त्याच्या बंडखोरीचे, क्रांतिकारक विचारांचे साक्षलेखच आहेत जणू! थोरोच्या या चरित्रातून होणारे क्रांतदर्शन असे आहे, की त्याने तरुण झपाटले जातील. मनाने जिवंत असलेल्या कुणाही तरुण-तरुणीने 'वॉल्डन' एकदा वाचले की थोरोचे चरित्र जाणून घ्यावेसे वाटतेच. स्वतःच्या राहणीवर शक्य तेवढा कमी खर्च करून, आपल्या मार्गान, आयुष्यभर प्रत्येक क्षणापासून रोकडी वसुली करीत तो अखेरपर्यंत चालत राहिला.' - चरित्रकार ऑगस्ट डलेंथ